आंब्रड आणि पोखरण गावातील विकासकामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

कुडाळ : आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातुन बजेट अंतर्गत आंब्रड परबवाडी टेंबवाडी रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे निधी १४ लाख आणि आंब्रड ग्रा. मा. ६८ कनकपालवाडी रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे निधी १४ लाख हि कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर पोखरण खालचीवाडी टेंबवाडी ग्रा. मा. ७२ या  रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करणे यासाठी १० लाख ८५ हजार रु. निधी मंजूर करण्यात आला असून या कामांची भूमिपूजने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. 

याप्रसंगी आंब्रड येथे  शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख सचिन कदम,आंब्रड विभागप्रमुख विकास राऊळ, आंब्रड सरपंच मानसी कदम,  माजी विभाग प्रमुख दिनकर परब, आबा मुंज, दीपक आंगणे, माजी पं. स. सदस्य प्रवीण भोगटे, ग्रा. पं. सदस्य सागर वाळके,  शाखाप्रमुख रमेश परब, शाखाप्रमुख दिगंबर मुळीक, कुंदे सरपंच रुपेश तायशेटे,बाळू पालव, विजय परब,रुपेश लाड यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोखरण येथे  सरपंच समीक्षा जाधव,शाखाप्रमुख संतोष सावंत,युवासेना शाखाप्रमुख अनिल सावंत,रवी पांगम,सचिन सावंत, बाळा शिवडावकर,राजू डेगवेकर,राजू घाडीगांवकर,नितीन महाडेश्वर यांसह शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!