आ. वैभव नाईकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंकडून कौतुकाची थाप 

शिवराजेश्वर मंदिरातील सिंहासनाच्या कामाचे केले कौतुक ; कार्यकर्त्यांकडून टाळ्यांचा प्रतिसाद

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेनेमध्ये फुट पडून ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सोबत जाऊन स्वतःची वेगळी चुल मांडली. मात्र आमदार वैभव नाईक यांनी ठाकरे कुटुंबासह एकनिष्ठ राहणे पसंत केले. शिवसेनेतील या बंडानंतर प्रथमच कोकण दौऱ्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालवण बंदर जेटी येथील सभेत आमदार वैभव नाईक यांचे कौतुक केले. आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून किल्ले सिंधुदुर्ग मधील शिवराजेश्वर मंदिरात उभारण्यात आलेल्या सिंहासनाच्या कामावरून ठाकरेंनी आ. नाईकांना भरसभेत भाषणावेळी बाजूला बोलावत त्यांचे कौतुक केले. यावेळी शिवसैनिकांनी एकच घोषणाबाजी करीत प्रतिसाद दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बहुप्रतीक्षित मालवण दौरा रविवारी पार पडला. यावेळी मालवण बंदर जेटी येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी आमदार वैभव नाईक यांना जवळ बोलावून त्यांचं तोंड भरून कौतुक केलं. वैभव नाईक यांनी किल्ले सिंधुदुर्गवर शिवराजेश्वर मंदिरात बसवलेल्या सिंहासनावरून उद्धव ठाकरेंनी वैभव नाईक यांची पाठ थोपटली. आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर अनेकदा आलो. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना १ मे रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती होती. तेव्हा त्यांच्यासोबत झेंडा लावायला मी आलेलो, अशी आठवण सांगून छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे, त्याला साजेसे सिंहासन करण्याचे काम वैभव नाईक यांनी केलं.आपला राजा, आपल्या राजाच वैभव त्यांनी जोपसलं, असे सांगून अलीकडे राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. ज्यांनी हा पुतळा उभारला ते महाराजांपासून काय शिकले. काही शिकलेले नाही. महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. त्या महाराजांचा महाराष्ट्र लुटमारे महाराजांचा पुतळा उभा करून गेले, असे ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!