कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला !

शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मालवणच्या भरड नाक्यावर भव्य स्वागत 

मालवण | कुणाल मांजरेकर :  कोकण दौऱ्यावर आलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे रविवारी दुपारी मालवणात आगमन झाले. यावेळी तालुका शिवसेनेच्या वतीने भरड नाक्यावर त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचा ताफा मालवणात दाखल होताच भरड नाक्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राउत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार ओरसकर, किरण वाळके, सिद्धेश मांजरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी मोटारसायकल रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!