मालवण तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर ; १५ फेब्रुवारीला होणार पुरस्कार वितरण

महेंद्र पराडकर, झुंजार पेडणेकर, प्रशांत हिंदळेकर यांना पत्रकार पुरस्कार तर मालवणरत्न व कलारत्न या दोन विशेष पुरस्कारांसाठी डॉ. दीपक परब-मुळीक व तारक कांबळी यांची निवड

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे पत्रकार पुरस्कार तसेच मालवणरत्न व कलारत्न हे दोन विशेष पुरस्कार निवड समिती आणि तालुका कार्यकारणी यांच्या संयुक्त बैठकीत एकमताने निश्चित करण्यात आले आहेत. १५ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली आहे. 

जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार पत्रकार महेंद्र पराडकर, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार पत्रकार झुंजार पेडणेकर आणि पत्रकार अमित खोत पुरस्कृत ‘बेस्ट स्टोरी अवार्ड’ हा विशेष पुरस्कार पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान मालवण पत्रकार समितीच्या वतीने यावर्षी पासून मालवणरत्न व कलारत्न हे दोन नवीन विशेष पुरस्कार सार्वजनिक क्षेत्रात आदर्शवत यश संपादन केलेल्या दोन व्यक्तीना दिले जणार आहेत. यातील मालवणरत्न या पुरस्कारासाठी डॉ. दीपक मुळीक-परब तर कलारत्न या पुरस्कारासाठी तारक कांबळी यांची निवड पुरस्कार निवड समिती व तालुका कार्यकरणी यांच्या वतीने एकमताने करण्यात आली.

मालवण तालुका पत्रकार समिती कार्यकारणी व पुरस्कार निवड समिती यांच्या बैठकीत पुरस्कार निवड निश्चित झाली. यावेळी अध्यक्ष संतोष गावडे, सचिव सौंगंधबादेकर, विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश सरनाईक, डिजिटल मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अमित खोत, तालुका उपाध्यक्ष कृष्णा ढोलम, दत्तप्रसाद पेडणेकर, खजिनदार सिद्धेश आचरेकर, सहसचिव संदीप बोडवे, प्रशांत हिंदळेकर, कुणाल मांजरेकर, नितीन गावडे, सुधीर पडेलकर आदी उपस्थित होते.

पुरस्कार वितरण सोहळ्यात मालवण पत्रकार समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा यांचा पारितोषिक वितरण तसेच पत्रकार गुणवंत पाल्य यांचेही सत्कार केले जाणार आहेत. अशी माहिती अध्यक्ष संतोष गावडे व सचिव सौंगंधबादेकर यांनी दिली. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!