दिवंगत सहकारमहर्षी डी. बी. ढोलम यांच्या पत्नी माई ढोलम यांचे निधन

मालवण : कट्टा वराड येथील श्रीमती. रतन उर्फ माई धोंडू ढोलम (वय – ८८) यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. दिवंगत सहकारमहर्षी डी. बी. ढोलम यांच्या त्या पत्नी होत्या.

श्रीमती रतन यांनी वराड ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले होते. सहकार महर्षी डी. बी. ढोलम यांच्या वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा होता. कुटुंबाला भक्कम आधार देण्याचे काम त्यांनी केले होते. बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगे प्रदिप, बाबा, देवेन (पप्पू), अमित (छोटू), मुलगी राजश्री (बेबी), रेखा, मनिषा असा परिवार आहे. आभाळमाया ग्रुपचे राकेश डगरे यांची ती आजी होत. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!