आचरा पोलिस निरीक्षकांचे शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे यांनी केले स्वागत 

आचरा : आचरा पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी सुरेश गावित यांची नियुक्ती झाली असून शिवसेना मालवण तालुकाप्रमुख महेश राणे यांनी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसह त्यांची आचरा पोलीस ठाण्यात भेट घेऊन त्यांचे स्वागत करत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

सुरेश गावित यांनी शनिवारी २७ जानेवारीला आचरा पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अवधूत हळदणकर, महेंद्र घाडी, अभिजित सावंत, चंदू गोलतकर, चंद्रकांत कदम, अमर पळसंबकर, प्रफुल्ल घाडी, श्रीपाद सावंत, अश्विन हळदणकर, प्रमोद देसाई, प्रवीण परब उपतालुकाप्रमुख चंदू गोलकर विभाग प्रमुख संतोष सावंत, रत्नदीप कदम, दत्तप्रसाद आंगणे आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!