राम मंदिर उदघाटनाच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त आज मालवणात निघणार भव्य रॅली

आकर्षक चित्ररथ होणार सहभागी ; जास्तीत जास्त राम भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

सर्व देशवासियांचे लक्ष लागून राहिलेला अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा उदघाटन सोहळा सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अपूर्व उत्साहात पार पडला. याचे औचित्य साधून मालवण शहरात राम भक्तांच्या वतीने आज सायंकाळी भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत आकर्षक चित्ररथ सहभागी होणार आहे.

श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त अयोध्यानगरी आज नटून उठली आहे. त्याचप्रमाणे आज देशात विविध ठिकाणी हर्षोउल्हासाचे वातावरण आहे. त्यानिमित्त मालवण मधील सर्व रामभक्तांच्या वतीने आज सोमवारी सायंकाळी ५.३० वा. मालवण एसटी डेपो येथील राम मंदिर येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली भरड नाका,  फोवकांडा पिंपळ करून पुन्हा राम मंदिर कडे येणार आहे. या रॅलीत चित्र रथ देखील सहभागी होणार आहे. तरी राम मंदिर निर्माण उत्सवाचा सण साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त रामभक्तांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!