मसुरेतील क्रिकेट स्पर्धेचे भाजपा नेते दत्ता सामंत यांच्याहस्ते उदघाटन

मालवण : मसुरे येथील माऊली भरतेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा दत्ता सामंत यांनी पुरस्कृत केली आहे. या प्रसंगी माजी जि. प. सदस्या सौ. सरोज परब, माजी उपसभापती छोटू ठाकूर, विलास मेस्त्री, शिवाजी परब, संतोष पालव, गणेश परब, संतोष मेस्त्री, उत्तम मेस्त्री, छोटू मेस्त्री, अमोल येरागी, दिलीप बागवे, बापू काळसेकर यांच्यासह सर्व ग्रामस्थ तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!