वायरी गर्देरोड येथे १९ जानेवारीला आधारकार्ड शिबीर
युवासेना पदाधिकारी तपस्वी मयेकर यांच्या वतीने आयोजन
मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवासेनेचे पदाधिकारी तपस्वी मयेकर यांच्या वतीने १९ जानेवारीला श्री. मयेकर यांच्या वायरी गर्देरोड येथील शांताराम निवास येथे प्रभागातील नागरिकांसाठी आधार कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात १८ वर्षाखालील मुलांचे नवीन आधार बनविणे, आधार कार्डला मोबाईल लिंक करणे, आधार कार्ड अपडेट करणे (नावात बदल, पत्ता बदलणे ) आदी कामे करण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी ९४०४५९८२८१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.