आडारी गणपती मंदिर सुशोभीकरण कामाला भाजपा नेते दत्ता सामंत यांची भेट
माजी नगरसेवक दीपक पाटकर यांसह स्थानिकांची उपस्थिती ; सुशोभिकरण कामाला मदतीचे आश्वासन
मालवण : शहरातील आडारी येथील गणपती मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाला आज भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी भेट दिली. यावेळी मंदिराच्या कामाला मदत करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
यावेळी विजय ढोलम, गुरुनाथ शिरोडकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, बाळा फाटक, मुन्ना फाटक, मिलिंद फाटक, पप्पू.गावकर, मंगेश गावकर, अण्णा, श्री. चव्हाण यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.