मालवणात शिवसेनेचा जल्लोष…
मालवण : मागील वर्षभर सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर मालवण शहरातील भरड नाका येथे मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी कारण्यात आली.
यावेळी शिवसेना मालवण कुडाळ विधानसभा प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, किसन मांजरेकर, ऋत्विक सामंत, शिवम हिर्लेकर, अरुण तोडणकर, कमलाकांत पारकर, धीरज केळुसकर, नितेश पेडणेकर, हर्षद पारकर, कमलेश सारंग, श्रीहरी खवणेकर यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.