भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय मुलांना फळवाटप
असरोंडी गावचे माजी उपसरपंच मकरंद राणे आणि भाजपा कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून उपक्रम
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या रविवारी होत असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून असरोंडी गावाचे माजी उपसरपंच मकरंद राणे यांच्या पुढाकारातून शनिवारी गावातील शालेय मुलांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी गावातील तिन्ही प्राथमिक शाळांमध्ये फळवाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे बूथ अध्यक्ष संजय सावंत, रघुनाथ सावंत, मोहन सावंत, माजी उपसरपंच रामदास सावंत, अभिमन्यू सावंत, अरुणा सावंत, माजी सरपंच स्नेहल सावंत, अनिल सावंत, माजी सरपंच संतोष महाजन, संतोष परब, ग्रा. पं. सदस्या आरती आजगांवकर, माजी उपसरपंच रामचंद्र सावंत आदिंसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.