एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. एस. व्ही. ढणाल यांची नियुक्ती
मालवण : मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. एस. व्ही. ढणाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ जानेवारी रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, सेक्रेटरी नेहा पाल, खजिनदार वृषाली कदम, विश्वस्त केतन कदम तसेच प्राध्यापक सूर्यकांत नवले यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. ढणाल यांनी शिवाजी विद्यापीठातून मेकॅनिकल इंजीनियरिंगमध्ये बी.ई.तसेच एम. ई.पदवी मिळवली असून मेकॅनिकल इंजीनियरिंग मध्ये विश्वेश्वराय टेकनॉलॉजी युनिव्हर्सिटी बेळगाव येथून पीएचडी संपादन केली. डॉ. एस. व्ही.ढणाल यांनी वारणानगर इंजिनियरिंग कॉलेज येथील के आय टी कव्हरेज ऑफ इंजीनियरिंग कोल्हापूर येथे प्राध्यापक तसेच संजय घोडावत युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापक विभाग प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांना संशोधन अध्यापन, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट समन्वय यांचा प्रदीर्घ अनुभव आहे.