शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजेंद्र उर्फ राजा गावकर यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी वर्णी
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर नवीन पाच सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख राजेंद्र उर्फ राजा गावकर यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी वर्णी लावण्यात आली आहे.
राजेंद्र उपेंद्र गावकर उर्फ राजा गावकर जनसामान्यातलं एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व. नावाप्रमाणेच राजा माणूस. सुरुवातीचं बालवाडी पासून दहावीपर्यंतचे शिक्षण कुडाळ मध्ये झालं. त्यानंतर उर्वरित शिक्षण स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण त्यानंतर मार्केटिंग क्षेत्रात मालवण तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्हाची कोको कोला कंपनीची एजन्सी व कोको कोला कंपनीमध्ये नोकरी करत असताना संपूर्ण मालवण तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेली ओळख याचा वापर राजकारणासाठी करून घेतला आणि राजकारणाची सुरुवात प्रभाग निरीक्षक म्हणून केली. सुरुवातीचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कै.दीपक मयेकर यांचे जवळचे मित्र आणि त्यांच्याच साथीने राजकारणात पदार्पण केले. त्यावेळी प्रभाग निरीक्षक म्हणून पहिलं पद मिळालं. पुढे जाऊन नितीन वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दीपकभाई केसरकर यांच्या नेतृत्वात मालवण तालुकाध्यक्ष हे पद यशस्वीरित्या पाच वर्षे सांभाळले. त्या काळात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या ध्येय धोरणांशी अधीन राहुन तालुक्यातील विविध विकास कामांना चालना दिली तसेच त्या वेळचे मंत्री उदय सामंत आणि मंत्री भास्कर जाधव यांचेही ते निकटवर्तीय मानले जातात. त्यानंतर राजकारणातील काही वाद विवादामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करून सुद्धा मेहनत निष्ठा या कितीही असली तरीही २०१४ मालवण नगरपालिका निवडणुकीत त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे ते राजकारणापासून पाच वर्ष अलिप्त राहिले. त्यानंतर महाराष्ट्र चेंबर्स आॉफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲंड ॲरीकल्चरचे सदस्यत्व स्वीकारले आणि मग पुन्हा एकदा शिवसेनेत शिंदे गट स्थापन झाल्यामुळे पुन्हा नव्याने राजकारणात मंत्री उदय सामंत आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या विनंतीला मान देऊन राजकारणात सक्रिय झाले ते थेट तालुकाप्रमुख मालवण या पदावर कार्यरत होऊन. मंत्री दीपक केसरकर यांच्या शिफारशीनुसार राजा गावकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.