मालवण ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयी विरोधात मंदार केणी यांचे उपोषण सुरु
मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधांची कमतरता आहे. याबाबत मागणी – पाठपुरावा करूनही रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याची स्थिती कायम आहे. याबाबत शासन, प्रशासनास जाब विचारण्यासाठी माजी नगरसेवक मंदार केणी यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयासमोर बुधवारी सकाळपासून आमरण उपोषण छेडले आहे. जोपर्यत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा केणी यांनी दिला आहे. यावेळी भाई कासवकर तसेच नागरिक उपस्थित होते.