आई माऊली, कोकणावर कोणतंही संकट नको येउदेत !

भाजपा नेते निलेश राणे यांचं चिंदरच्या माऊली देवीला साकडं ; जत्रोत्सवानिमित्त घेतलं देवीचं दर्शन

चिंदर गावच्या विकासासाठी धडपडणाऱ्या तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचे कौतुक

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे संयोजक, माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी रात्री चिंदर गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी आगामी काळात कोकणावर कोणतंही संकट येऊ देत नको, असे साकडे त्यांनी देवीच्या चरणी घातले. ग्रामपंचायतीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे उदघाटन यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, चिंदर गावात भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरु असून या कामांसाठी प्रयत्न करणाऱ्या गावचे सुपुत्र तथा भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचे त्यांनी कौतुक केले.

चिंदर गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी पार पडला. या जत्रोत्सवाला भाविकांनी अलोट गर्दी केली होती. भाजपचे नेते निलेश राणे यांनी रात्री याठिकाणी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, महेश मांजरेकर, मंगेश गावकर, चिंदर सरपंच सौ. स्वरा पालकर, उपसरपंच दीपक सुर्वे, संतोष गावकर, रवि घागरे, शेखर कांबळी, देवेंद्र हडकर, प्रकाश मेस्त्री, शशी नाटेकर, मनोज हडकर, योगेश पडवळ, अरूण घाडी, दत्ता वराडकर, राजु परब, सानिका चिंदरकर, आशिष हडकर, प्रकाश तोंडवळकर, विजय निकम यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भाजपच्या कार्यालयाला निलेश राणे यांनी भेट दिली. याठिकाणी सरपंच सौ. स्वरा पालकर यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना निलेश राणे यांनी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या कार्याचे कौतुक केले. आज भाजपाच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरु आहेत. याचे श्रेय श्री. चिंदरकर यांचे आहे. आपला गाव विकासात अग्रेसर राहिला पाहिजे, यासाठी चिंदरकर हे प्रामाणिक प्रयत्न करीत असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे ते सातत्याने पाठपुरावा करताना दिसतात. गावाचा विकास करण्यासाठी आई माऊलीने त्यांना अशीच ऊर्जा आणि ताकद द्यावी, अशी प्रार्थना निलेश राणे यांनी करत आगामी काळात देखील चिंदर गावच्या विकासासाठी भाजपाच्या माध्यमातून निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!