सिंधुदुर्ग जिल्हा बँक मसुरे शाखेच्या नूतन इमारतीचा उद्या स्थलांतर सोहळा 

माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

सिंधुनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मसुरे – मर्डे शाखेचा स्थलांतरण सोहळा उद्या बुधवार, दि. २७ डिसेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिवाजी परब यांच्या इमारतीमध्ये ही शाखा स्थलांतरित होत आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक व्हिक्टर डान्टस, संदीप उर्फ बाबा परब, मेघनाद धुरी, उद्योजक श्रीकृष्ण उर्फ दीपक परब, मसुरे ग्रामपंचायत सरपंच संदीप हडकर, देऊळवाडा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मसुरेचे अध्यक्ष विश्वास साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. या स्थलांतर सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सर्व संचालक मंडळ व जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!