मालवणात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेची सांगता ; नागपूरची संजना जोशी व पालघरचा यश जाधव वेगवान जलतरणपटू

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना, मालवण नगरपरिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने चिवला बीच मालवण येथे आयोजित 13 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेची सांगता रवीवारी झाली. 10 किलोमीटर खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत संजना जोशी (नागपूर) आणि यश जाधव (पालघर) यांनी सुवर्णपदक प्राप्त करत स्पर्धेतील वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळवला.

दोन दिवसीय स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी सकाळी मालवण चिवला बीच येथे झाला होता.  राज्यभरातील 26 जिल्ह्यातील हजारो स्पर्धक सहभागी झाले. खुल्या स्पर्धेत 9 राज्यातील स्पर्धक सहभागी झाले. राज्य व जिल्हा सचिव राजेंद्र पालकर व सर्व सहकारी यांच्या उत्कृष्ट आयोजनात स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे सर्वांनीच कौतुक केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण (दीपक) परब, उपाध्यक्ष बाबा परब, निल लब्दे, समिर शिरसेकर, अर्जुन दळवी, सचिव राजेंद्र पालकर, खजिनदार, अरुण जगताप, सहसचिव किशोर पालकर, सदस्य सुनील मयेकर, मिलिंद राणे, सल्लागार डॉ. राहुल वालावलकर, कादेशीर सल्लागार ऍड. आर. एम. नाखवा, लाईफ सेविंग युनिटचे युसूफ चुडेसरा, मुख्य प्राशिक्षक महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना निळकंठ आखाडे व सर्व आयोजक टीम तसेच राज्य संघटना अध्यक्ष आनंद माने, माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर, सौ. जोत्स्ना परब, राजा केरीपाळे, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, किसन मांजरेकर, हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू अमित हर्डीकर यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेतील विविध गटातील विजेत्यांना मेडल व अन्य पारितोषिक देत गौरवण्यात आले.

स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते

रविवारी विविध गटातील स्पर्धा संपन्न झाली. यात 500 मिटर 6 ते 7 वर्ष वयोगट विजेता तनय लोढा(पुणे), विजेती तेजस्विनी ताकभाटे (सोलापूर), 1 किलोमीटर मुलगे विजेता आदर्श मिश्रा (नाशिक), निधी कोडवाणी (नाशिक), 2 किलोमीटर विजेता इरावण आजगावकर (मुंबई), अय्यना पटेल (नाशिक), 10 किलोमीटर ग्रुप 1 विजेता यश जाधव (पालघर), ग्रुप 2 विजेता आलोक जाधव (नाशिक), 10 किलोमीटर मुली ग्रुप 1 विजेती संजना जोशी (नागपूर), ग्रुप 2 विजेती रेवा परब (ठाणे) दिव्यांग ग्रुप मुलगे 1 किमी  विजेता रचित नरसिंघानी (कोल्हापूर), शरण्या कुंभार (बेळगाव), दिव्यांग ग्रुप 1 किमी साहिल जाधव (बेळगाव), आभा मुंडे (बीड) यांनी सुवर्णपदक प्राप्त केले.

स्पर्धेच्या 13 वर्ष वाटचालीत स्पर्धा आयोजनात महत्वाची भूमिका असलेले संघटना सचिव राजेंद्र पालकर यांचा सर्वांच्या वतीने विशेष सत्कार स्पर्धेच्या सांगता सोहळ्यात करण्यात आला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!