राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत प्रथमच “सिंधुदुर्ग” ला यश ; ५ किमी स्पर्धेत पोईपच्या भाग्येश पालवला सुवर्णपदक
सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या प्रयत्नांना यश ; मुलांच्या गटात पालघरच्या यश जाधव तर मुलींच्या गटात नागपूरच्या संजना जोशी यांना वेगवान जलतरणपटूचा बहुमान
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण पालिका यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत तेरा वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्गच्या भाग्येश पालव या जलतरणपटूने पाच किलोमीटरच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. भाग्येश पालव हा मालवण तालुक्यातील पोईप गावचा असून त्याच्या या यशामुळे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गचे नाव झळकले. दरम्यान या स्पर्धेत मुलांच्या गटात पालघरच्या यश जाधव तर मुलींच्या गटात नागपूरच्या संजना जोशी यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान पटकाविला.
येथील चिवला बीच येथील समुद्रात आज १३ वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उदघाटन संघटनेचे अध्यक्ष दीपक परब यांच्या हस्ते करण्यात आले. यात मुले, मुली, पुरुष व महिला अशा विविध गटात एक, दोन, तीन व पाच किलोमीटर पोहण्याच्या स्पर्धा झाल्या.
स्पर्धेचा निकाल असा- ८ ते १० वर्षे एक किलोमीटर- मुले- रुद्र गुप्ता (ठाणे), रणवीर भोईर (ठाणे), विघ्नेश बरागे (कोल्हापूर), मुली- श्रीनिथी कुमार (ठाणे), शरन्या बरागे (कोल्हापूर), ओवी चिंदरकर (ठाणे), ११ ते १२ वर्षे २ किलोमीटर- मुले- वेदांत मिसळे (बेळगाव), शार्दूल लाटे (पुणे), तनय लाड (ठाणे), मुली- रेवा परब (ठाणे), निधी कुलकर्णी (बेळगाव), आयुषी अखाडे (ठाणे).
५६ वर्षावरील गट २ किलोमीटर- पुरुष- नारायण हजारे (सांगली), महादेव तवारे (पुणे), शिरीष पत्की (पुणे), महिला गट- गायत्री फडके (पुणे), स्वस्थिका गिरकर (रायगड), वर्षा कुलकर्णी (सांगली), १६ ते १८ वर्षे ५ किलोमीटर- मुले- यश जाधव (पालघर), धैर्यशील भोसले (कोल्हापूर), स्मरण मंगलोरकर (बेळगाव), मुली- संजना जोशी (नागपूर), श्रावणी वालावलकर (रत्नागिरी), मिहिका कोळंबकर (मुंबई), १९ ते २५ वर्षे ५ किलोमीटर- मुले- भाग्येश पालव (सिंधुदुर्ग), वरद कुवर (नाशिक), ताहीर मुलानी (कोल्हापूर), मुली- सुबिया मुलानी (कोल्हापूर), स्नेहल जोशी (नागपूर), दयीता बंगेरा (मुंबई).
१३ ते १५ वर्षे ३ किलोमीटर- मुले- आदर्श मिश्रा (नाशिक), धवल हणमन्नावर (बेळगाव), अनिश पई (बेळगाव), मुली- आरोही पालखडे (रत्नागिरी), आत्मजा शहाणे (नाशिक), ओवी शहाणे (नाशिक). २६ ते ३६ वर्षे- ३ किलोमीटर- पुरुष- प्रीतम पाटील (सांगली), अक्षय महातो (मुंबई), उर्मित पटेल (नागपूर), महिला- स्नेहा रहाटे (रत्नागिरी), आसावरी निरगुटे (नाशिक), ऋतुजा भागवत (नाशिक), ४६ ते ५५ वर्षे ३ किलोमीटर- पुरुष- संजय जाधव (सांगली), किशोर पाटील (रायगड), संजय वालावडे (सांगली), महिला- महेश्वरी सरनोबत (कोल्हापूर), सुनीता धोते (नागपूर), रेणुका मेनन (मुंबई), ३६ ते ४५ वर्षे- महिला- नुषीन नळवाला (पुणे), गीतांजली चौधरी (ठाणे), अंजली गजभिये (नागपूर), पुरुष- गिरीश मुलूक (पुणे), गगन देशमुख (कोल्हापूर), राहुल राणे (मुंबई) यांनी यश मिळविले.
एक किलोमीटर मुलांच्या गटात रुद्र गुप्ता (ठाणे), मुलींच्या गटात श्रीनिथी कुमार (ठाणे) यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळविला. २ किलोमीटर मुलांच्या गटात वेदांत मिसळे (बेळगाव), मुलींच्या गटात रेवा परब (ठाणे) यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळविला. ३ किलोमीटर मुलांच्या गटात आदर्श मिश्रा (नाशिक), मुलींच्या गटात आरोही पालखडे (रत्नागिरी) यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना आमदार वैभव नाईक, मुख्याधिकारी संतोष जिरगे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक परब, सचिव राजेंद्र पालकर, उपाध्यक्ष बाबा परब, धोंडी चिंदरकर, अरविंद मोंडकर, उमेश सांगोडकर, सुधीर साळसकर यांच्यासह अन्य मान्यवर व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिके, चषक, मेडल, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.