सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने मालवणात महिलांसाठी ऑनलाईन तुळस सजावट स्पर्धा

स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष ; प्रथम तीन क्रमाकांना आकर्षक बक्षिसे तर विशेष प्रोत्साहन पर बक्षीसांचा देखील समावेश 

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने तुलसी विवाहाचे औचित्य साधून महिलांकरीता मालवण शहर मर्यादित ऑनलाईन तुळस सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मागील वर्षी सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाने भरवलेल्या तुळस सजावट स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. 

या स्पर्धेत प्रथम विजेत्या तीन स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून या व्यतिरिक्त अन्य काही जणांना विशेष प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत रांगोळी व पणत्या असणे आवश्यक असून रांगोळी व तुळस सजावट नीटनिटके असणे आवश्यक आहे. स्पर्धकाने आपल्या सजवलेल्या तुळस व रांगोळी याचा फोटो नाव व पत्त्यासहित 9209333012 किंवा 7588564887 या व्हाट्सअँप क्रमांकावर पाठवावेत. दि. २४ नोव्हेंबर सायं. ६.३० वाजेपर्यंतचे फोटो स्पर्धेत सहभागी केले जातील. परीक्षकांना आवडलेल्या पहिल्या १० स्पर्धकांच्या घरी भेट दिली जाईल. तरी या स्पर्धेत मालवण शहरातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सौरभ ताम्हणकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!