… हा तर हरी खोबरेकर यांच्याकडून आचऱ्यातील मतदारांवर अविश्वास !

भाजपच्या संतोष कोदे यांचा पलटवार ; माजी खासदार निलेश राणे यांचे झंझावती नेतृत्व आणि दत्ता सामंत व सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेमुळे आचऱ्यात भाजपाचा विजय

मालवण | कुणाल मांजरेकर

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने भरमसाठ पैसा वापरल्याचे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे वक्तव्य म्हणजे आचरा गावातील मतदारांवर व्यक्त केलेला अविश्वास आहे. आचरे गावातील मतदारांवर पैसे घेतल्याचा खोटा आरोप खोबरेकर यांनी केला असून याचे उत्तर आचरा ग्रा. पं. च्या निवडणूक निकालातून ठाकरे गटाला पराभवाच्या स्वरूपात मिळाले आहे. आचरेवसीय जनता पैशाने विकली जात नाही हे आचरा वासियांनी दाखवून दिले, अशी भूमिका आचरा भाजप विभाग अध्यक्ष संतोष कोदे यांनी मांडली आहे.

आचरा निवडणूक निकालानंतर ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी प्रतिक्रिया देताना भरमसाठ पैसा आणि खोटी आश्वासने यामुळे भाजपने सत्ता मिळवल्याचा आरोप केला होता. या विधानांचा समाचार संतोष कोदे यांनी घेतला. आचरे वासिय जनता पैशाला विकली जात नाही. भाजपचे जेरॉन फर्नांडीस व सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठाम असल्याचे जनतेने निवडणूक निकालातून दाखवून दिले आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली गाव विकासाला अधिकाधिक प्राधान्य देण्यासाठी सरपंच व सर्व सदस्य कटिबद्ध राहतील. निवडणूक प्रचारादरम्यान आचरा गावातील वाडी वस्तीवर भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पदाधिकारी यांनी पंधरा पेक्षा जास्त बैठका घेतल्या. प्रत्येक बैठकांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जनतेने विकासाचे प्रश्न मांडताना आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्या अपयशी कारभाराचा पाढाही वाचला. जनतेच्या भावना दत्ता सामंत यांनी जाणून घेत केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ते सोडविण्यासाठी सरपंच जेरॉन फर्नांडीस व सर्व सदस्य तसेच आम्ही सर्व पदाधिकारी कटीबद्ध असल्याचे सांगितले होते.

दत्ता सामंत व सर्व भाजप, शिवसेना पदाधिकारी यांनी एकसंघपणे संघटित होऊन प्रचार यंत्रणा राबवली. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून होत असलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवली. या सर्वांमुळे जनतेने भाजपावर विश्वास ठेवत बहुमताने सर्व उमेदवारांना विजयी केले. भाजपचा हा विजय माजी खासदार निलेश राणे यांच्या झंझावती नेतृत्वाचा तसेच दत्ता सामंत व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वाडी वस्तीवर राबविलेल्या प्रचार यंत्रणेचा आहे. असे असताना धनशक्ती या शब्दाचा वापर करून ठाकरे गट आचरेतील मतदारांवर आरोप करून मिळालेल्या पराभवाचे अपयश बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र, ठाकरे गटाने लक्षात ठेवावे, आचरे गावातील जनता सुज्ञ आहे. ती मतपेटीतूनच योग्य उत्तर देते एवढे नक्की, असे कोदे यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!