VIDEO : विकास हाच अजेंडा ठेवून भाजपा – शिवसेना युतीचे उमेदवार ग्रा. पं. निवडणुकीच्या रिंगणात !
येणाऱ्या ६ नोव्हेंबरला गुलाल उडेल तो भाजपा – शिवसेनेच्या युतीचाच ; भाजपा नेते निलेश राणे यांचा विश्वास
आचरा सरपंच पदाचे उमेदवार जेरोन फर्नांडिस आणि सदस्य उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील
आचरा | कुणाल मांजरेकर
आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा – शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी आचऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. माजी जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्यासह स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थिती दर्शवली. दरम्यान, भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी याठिकाणी उपस्थिती दर्शवत प्रचाराचा आढावा घेतला. मालवण तालुक्यातील आचरा ग्रा. पं. सह कुडाळ तालुक्यातील पाच ग्रा. पं. च्या निवडणूका होत असून केंद्रासह राज्यातील सरकारच्या माध्यमातून झालेला विकास आणि भविष्यात होऊ घातलेला विकास हाच अजेंडा घेऊन आम्ही या निवडणुका लढवत आहोत. आचरा गावात भाजपा- शिवसेना युतीचे सरपंच पदाचे उमेदवार जेरोन फर्नांडिस यांना मानणारा एक मोठा वर्ग असून जेरोन फर्नांडिस यांच्यासह सदस्य पदाचे १३ ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. ५ नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर आचऱ्यासह संपूर्ण जिल्ह्यात गुलाल उडेल तो भाजपा – शिवसेना युतीचाच उडेल, असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.
आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. भाजपचे जेरोन फर्नांडीस यांनी घरोघर प्रचारावर भर देत आपला झंझावाती प्रचार केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार निलेश राणे यांनी आचरे गावात भेट देत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवारांशी चर्चा केली. निवडणुक प्रचाराचा आढावा घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडीस, महेश मांजरेकर, महेंद्र चव्हाण, विजय इंगळे, निवडणूक प्रभारी संतोष कोदे, निवडणूक प्रमुख संतोष गावकर, राजन पांगे, बाबू परुळेकर, दीपक सुर्वे, मंदार सरजोशी, बाबू कदम, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती राजू परुळेकर, महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, पूजा सरकारे, महिमा मयेकर, प्रमोद करलकर, सचिन हडकर, दत्ता वराडकर, यासह सदस्य पदाचे उमेदवार सारिका नंदकिशोर तांडेल, प्रियता पांडुरंग वायंगणकर, मुजफ्फर बशीर मुजावर, प्राजक्ता नामदेव देसाई, सायली सचिन सारंग, योगेश गोविंद गांवकर, श्रुती श्रीपाद सावंत, चंद्रकांत धोंडू कदम, हर्षदा उदय पुजारे, महेंद्र गोविंद घाडी, पंकज वामन आचरेकर, किशोरी किशोर आचरेकर, संतोष गणपत मिराशी आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले, शिवसेना भाजप सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. पुढील पाच वर्षात काय करणार याचा अजेंडा घेऊन लोकांसमोर जात आहोत. त्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडीस यांचे स्वतःचे एक वेगळे वलय आहे. आम्ही कसल्याच राजकारणात पडलो नाही. प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे निकालात विजय आमचाच होणार असून गुलाल भाजप – शिवसेना युतीचाच उडणार असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.