शासकीय तंत्रनिकेतन मालवणच्या जीएस पदी दत्ताराम नाईक यांची निवड

भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांचे विशेष प्रयत्न ; भाजपा नेते दत्ता सामंत यांच्याकडून सत्कार

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यापीठ प्रतिनिधी (GS) पदी दत्ताराम नाईक यांची निवड झाली आहे. या निवडीसाठी भाजपा युवा मोर्चाचे मालवण तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांनी विशेष प्रयत्न केले. भाजप नेते दत्ता सामंत यांनी दत्ताराम नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी वायरी ग्रामपंचायत सदस्य संजय लुडबे, भाजपा युवामोर्चा मालवण तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, भाजपा युवामोर्चा मालवण शहराध्यक्ष ललित चव्हाण तसेच यश सावंत, शुभम मेस्त्री, युवराज दळवी, शिवम बोन्द्रे, राजीव घेवडे, ज्ञानेश करपे, शंभूनाथ गवंडी, दीपक परब, मोहन गावडे, सर्फरोष अतनिकर यांच्यासह अन्य विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी दत्ताराम नाईक यांनी त्याला या पदासाठी निवडून येण्यासाठी ज्या विद्यार्थी प्रतिनिधी तसेच मित्र मंडळीचे तसेच प्राचार्य, कॉलेजचे सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग याचे आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!