आचरा ग्रा. पं. निवडणुकीत रंगत ; निवडणूक रणनितीकार दत्ता सामंत यांच्या धडाक्यामुळे भाजपा पुरस्कृत पॅनलला वाढता पाठींबा

भाजपा – शिवसेना पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार जेरोन फर्नांडीस व सहकारी सदस्य पदाच्या उमेदवारांचा घरोघरी प्रचारावर भर

जेरोन फर्नांडिस यांच्यासह तेराही सदस्य बहुमताने विजयी होणार ; विरोधकांचे डिपॉझिट होणार जप्त : दत्ता सामंत यांचा विश्वास

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या ५ नोव्हेंबर रोजी होऊ घातली आहे. जसे मतदानाचे दिवस जवळ येत आहेत तशी प्रचारात रंगत येत आहे. भाजपचे निवडणूक रणनितीकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रचाराच्या धडाक्यामुळे भाजपा – शिवसेना पुरस्कृत श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनलला वाढता पाठींबा मिळत आहे. भाजपा – शिवसेना पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार जेरोन फर्नांडीस व सहकारी सदस्य पदाच्या उमेदवारांनी घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. भाजप, शिवसेना पुरस्कृत श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनलला जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून आमच्या पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होऊन विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवड केली जाणार आहे. सरपंच पदासह तेरा सदस्यांसाठी हि निवडणूक होत आहे. सरपंच पदासाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असून प्रचाराचा जोर वाढत आहे. सर्व उमेदवार एकसंघपणे प्रचार करत असून आचरा वासियांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

भाजप, शिवसेना पुरस्कृत श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनलचे सरपंच उमेदवार जेरॉन फर्नांडिस यांसह सदस्य उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये वार्ड क्र 1 : सारिका नांदाकिशोर तांडेल, प्रियता पांडुरंग वायंगणकर, मुजफ्फर बशीर मुजावर, वार्ड क्र 2 : प्राजक्ता नामदेव देसाई, सायली सचिन सारंग, योगेश गोविंद गांवकर, वार्ड क्र 3 : श्रुती श्रीपाद सावंत, चंद्रकांत धोंडू कदम, वार्ड क्र 4 : हर्षदा उदय पुजारे, महेंद्र गोविंद घाडी, वार्ड क्र 5 : पंकज वामन आचरेकर, किशोरी किशोर आचरेकर, संतोष गणपत मिराशी

सोमवार पासून भाजप सेना पुरस्कृत उमेदवारांनी घरोघरी प्रचारात भर दिल्याचे दिसून येत आहे. प्रभाग एक हिर्लेवाडी पिरावाडी, प्रभाग चार मध्ये देवूळवाडी, प्रभाग पाच मध्ये वरचीवाडी, भंडारवाडी येथे तसेच अन्य ठिकाणी भाजप शिवसेना पुरस्कृत उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत मतदारांच्या घरोघरी भेटी घेत प्रचार सुरू केला होता. सर्वच प्रभागात जाऊन जनतेच्या भेटी घेत प्रचार करण्यात येत आहे. ३ नोव्हेंबर पर्यंत प्रचार सुरु राहणार आहे. भंडारवाडी येथे प्रचार दरम्यान मोठी उपस्थिती होती. यावेळी जेरॉन फर्नांडिस यासह सर्व सदस्य उमेदवार तसेच गजानन गावकर, वामन आचरेकर, रुपेश हडकर, बबन शेट्ये, किशोर आचरेकर, मंदार सरजोशी, गुरु कांबळी, बाबू कदम, महादेव मिराशी, मंदार आचरेकर, सुनील आचरेकर, वृषाली आचरेकर, प्रिया आचारेकर, तृप्ती मिराशी, मनाली आचरेकर, गौरी मिराशी, निकिता मिराशी यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रचार यंत्रणा

भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी निवडणुकीत विशेष लक्ष दिले आहे. उमेदवार यांसह थेट मतदारांच्या गाठीभेठी ते घेत असताना भाजप शिवसेना पुरस्कृत सर्व उमेदवार यांच्या विजयाचा विश्वास जनतेतून ठामपणे व्यक्त केला जात आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असेही चित्र असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले. यावेळी आचरा ग्रामपंचायत सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडिस, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संतोष गावकर, संतोष कोदे, सचिन हडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, बाबू परुळेकर, अभिजीत सावंत, राजन पांगे मंदार सरजोशी, सुहास परब, चंद्रकांत कदम, प्रवीण परब, रुपेश साटम, उमेश सावंत, सुधीर सावंत, प्रमोद देसाई, संतोष सावंत, मंगेश परब, प्रशांत देसाई, दीपक आचरेकर, विशाल आचरेकर, सचिन आचरेकर, अतुल लाड, पपू कामतेकर, प्रमोद वाडेकर, भाऊ हडकर, महेंद्र परब, संकेत परब यसह अन्य उपस्थित होते.

जेरोन फर्नांडिस जनतेच्या मनातील उमेदवार : दत्ता यांनी

जेरोन फर्नांडिस हे जनतेच्या मनातील उमेदवार आहेत तसेच सदस्य पदाचे उमेदवारही जनतेच्या मनातीलच आहेत. त्यामुळे सर्वांचा विजय निश्चित आहेत. राज्यात भाजप शिवसेना सत्ता असून मागील काही काळात गतिमान विकास होत आहे. जेरोन फर्नांडिसही आता सरपंच होऊन सत्तेतील आमदार म्हणून विराजमान होणार. केंद्र व राज्य सरकार माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आचरे गावातही अधिकाधिक निधी उपलब्ध होईल. आताही गावात काम सुरु असलेली जलजीवन मिशन योजनेतील पाणी योजना पंतप्रधान यांच्या माध्यमातून होत आहे. यापुढेही गावात असाच विकास सुरु राहील. असे दत्ता सामंत म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!