मालवण, कुडाळ तालुक्यातील स्थगिती उठलेल्या “त्या” ८७ विकासकामांचे श्रेय घेणाऱ्या आ. वैभव नाईकांची पोलखोल !
१५ कोटींचा निधी मिळाल्याचे सांगणाऱ्या आ. नाईकांनी निधी कधी येणार ते जाहीर करुन श्रेय घ्या ; धोंडू चिंदरकर यांचे आव्हान
या विकास कामाना विविध हेडखाली निधी मंजूर करण्यासाठी भाजपा नेते निलेश राणे प्रयत्नशील ; ना. राणे, पालकमंत्र्यांच्या सहकार्याने पाठपुरावा
मालवण | कुणाल मांजरेकर
केवळ दुसऱ्यांच्या कामांचे श्रेय घेणे आणि आणि इतरांच्या कामांना आपले लेबल लावणे हाच एककलमी कार्यक्रम वैभव नाईक यांचा आहे. कुडाळ मालवण तालुक्यातील ८७ कामांवरील स्थगिती उठवली, १५ कोटी मंजूर झाले असे आ. वैभव नाईक सांगत असले तरी यात वैभव नाईक अथवा तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारचे कोणतेही श्रेय नाही. ८७ विकासकामांवरील स्थगिती उठली असे सांगणाऱ्या वैभव नाईक यांनी या कामाना निधी कधी मिळणार हे जाहीर करावे. अशी भूमिका भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मांडली आहे.
दरम्यान, जनहिताच्या दृष्टीने ही विकासकामे लवकर होण्यासाठी तसेच या विकासकामाना विविध हेडखाली निधी मंजूर व्हावा यासाठी भाजप कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे प्रयत्नाशील आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून राज्य सरकार कडून या विकासकामांची पूर्तता भाजपा सरकारच्या माध्यमातून निश्चित केली जाईल. असेही धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.
विकास कामाना कुठल्या हेड खाली निधी मिळणार या सर्व बाबींची पूर्तता होणे बाकी आहे. अश्या स्थितीत वैभव नाईक जनतेची दिशाभूल करत ठाकरे सरकार काळातच या रस्त्याना निधी मिळाला होता असे खोटे वक्तव्य करत आहेत. प्रत्यक्षात निधी राज्यातील भाजप युती सरकारच मंजूर करणार आहे. त्यामुळे मीच सगळे केले असा दिखावा आणि स्टंटबाजी करणारे आमदार वैभव नाईक आताच्या घडीला कुठल्या हेडखाली या सर्व विकासकामाना निधी मिळणार याची तारीख जाहीर करू शकतील का ? असा रोखठोक सवाल भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी करत वैभव नाईक यांच्या वक्तव्याची पोलखोल केली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारच्या माध्यमातून गतिमान विकास होत आहे. राज्यातही भाजप शिवसेना युती सरकारच्या माध्यमातून गतिमान व जनहिताच्या विकासाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे वैभव नाईक यांच्या सारख्या विरोधी आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभवाची भीती डोळ्यासमोर दिसत असल्याने केवळ प्रसिद्धी आणि हव्यास यापोटी जनतेची दिशाभूल करण्याचे काम वैभव नाईक करत आहेत. २०२४ ला जनताच या सर्व प्रश्नांची उत्तरे मतदानातून त्यांना देईल. असेही धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.