आचरा ग्रा. पं. निवडणूकीत मंगेश टेमकर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार बहुमतांनी विजयी होतील…

शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा विश्वास ; महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन

आचरा | कुणाल मांजरेकर

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडी पुरस्कृत आचरा ग्रामविकास आघाडी पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर यांना ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत असून श्री देव रामेश्वराच्या आशीर्वादाने आणि जनता जनार्दनाच्या पाठींब्यावर टेमकर यांच्यासह शिवसेना – महाविकास आघाडीचे सर्व १३ ही उमेदवार बहुमतांनी विजयी होतील, असा विश्वास शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आचरा येथे व्यक्त केला. आचरा ग्रा. पं. निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन श्री. पारकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या आचरा ग्रामपंचायतची निवडणुक रणधुमाळी सुरु आहे. ठाकरे गट आणि महाविकास आघाडी पुरस्कृत आचरा ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आचरा तिठा येथील शिवसेना ठाकरे ठाकरे गट महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी सरपंच प्रणया टेमकर, सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर यांच्यासह सदस्य पदाचे उमेदवार प्रिया मेस्त्री, पूर्वा तारी, चंद्रशेखर मुणगेकर, अनुष्का गावकर, सुकन्या वाडेकर, सचिन बागवे, श्रद्धा सक्रू, अनिकेत मांजरेकर, युगंधरा मोरजे, सदानंद घाडी, चंदन पांगे, अमृता गावकर, माणिक राणे तसेच नितीन घाडी, प्रवीण आचरेकर, संजय परब, प्रकाश आचरेकर, नंदकिशोर सावंत, प्रशांत गावकर, नारायण कुबल, परेश तारी, विनायक परब, दिलीप कावले, उदय दुखंडे, विलास सक्रू, दशरथ घाडी, विजय पांगे, नरेश तारकर, संजय वायंगणकर, प्रवीण मुणगेकर, अनिल गावकर, दिलीप पराडकर, सत्यवान पांगे, कमलाकर पांगे, राजू परब तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहेत. सरपंच पदासाठी मंगेश टेमकर निवडणूक रिंगणात आहे. आचरा येथील जनतेचा शिवसेना आणि महाविकास आघाडीवर विश्वास आहे. त्यामुळे सरपंच उमेदवार मंगेश टेमकर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व सदस्य बहुमताने विजयी होणार असा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघात विकासकामांची घोडदौड सुरु आहे. आचरा गावात आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर आमचा विजय निश्चित आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने अनेक घोषणा केल्या होत्या. त्यातील एकही घोषणा पूर्ण केली नाही. मंगेश टेमकर यांनी या गावचे पदाचे पद यापूर्वी भूषविले आहे. जनतेच्या नेहमी संपर्कात असतात. गावच्या विकासासाठी नेहमीच झटत असतात. त्यामुळे येथील जनता ही मंगेश टेमकर आणि आमच्या सर्व सदस्यांच्या पाठीशी राहील. सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते हे प्रचारासाठी मेहनत घेत आहेत. सर्वच स्तरावर आमच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. सर्व समाज आम्हाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर यांच्यासह सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतील असा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला.

यावेळी तालूकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. देशाचे वातावरण बदलत असून आचरा ग्रामपंचायत येथून याची खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी आचरा गावात कोट्यावधीचा निधी देऊन विकासकामे मार्गी लावली आहेत. भाजपच्या भुलथापांना जनता बळी पडणार नाही. त्यामुळे सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर यासह सर्व सदस्य मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्वास खोबरेकर यांनी व्यक्त केला. अनुष्का गावकर यांनीही सर्व उमेदवार बहुमतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!