निलेशजी राणे पुन्हा एकदा त्याच दमाने, त्याच उत्साहाने आणि त्याच ऊर्जेने सक्रिय होतील…

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण | कुणाल मांजरेकर

संघटनेच्या दृष्टीने एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचे थांबणे देखील न परवडणारे असते. निलेश जी राणे हे तर आमचे सन्माननीय नेते आहेत. कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रमुख आहेत. गेले काही महिने त्यांनी जिल्ह्यात संघटनेचे जाळे उभे केले असून अत्यंत चांगले काम केले आहे. आज ते भावनेच्या भरात व्यक्त झाले आहेत, असं मला वाटतं. पण आमचे वरिष्ठ आणि आणि आम्ही कार्यकर्ते त्यांचं मन वळवण्यात नक्की यशस्वी होऊ. निलेशजी राणे पुन्हा एकदा त्याच दमाने, त्याच उत्साहाने आणि त्याच ऊर्जेने आम्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत सक्रिय होतील, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला आहे.

भाजपा नेते निलेश राणे यांच्या राजकीय संन्यासाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. निलेश राणे यांचे आजचे ट्विट वाचले आणि मनाला फार वेदना झाल्या. दिवसभर त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, असे सांगून आज ते जे व्यक्त झाले आहेत, ते भावनेच्या भरात ते व्यक्त झाले आहेत, असं मला वाटतं, आमची वरिष्ठ मंडळी आणि सर्व कार्यकर्ते त्यांचं मन वळवण्यात नक्की यशस्वी होतील याची मला खात्री आहे. आणि निलेश राणे त्याच दमाने, त्याच उत्साहाने आणि त्याच ऊर्जेने आम्हा सर्व कार्यकर्त्याना मार्गदर्शन करीत सक्रिय होतील. हा विषय आजच संपेल असा मला विश्वास आहे, असे त्यांनी म्हटले आहे

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!