युवा नेते विशाल परब यांची भाजपा युवामोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
सिंधुदुर्ग : भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या कामाची दखल घेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने युवा मोर्चा मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनानुसार भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी रविवारी कोल्हापूर दौऱ्यात युवानेते विशाल परब यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित केली आहे. या निवडी बद्दल श्री. परब यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.