मनसेच्या वतीने दसऱ्या निमित्ताने २४ ऑक्टोबरला मालवण बंदर जेटीवर भव्य खुल्या गरबा

मागील वर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर सलग दुसऱ्यावर्षी आयोजन

वेशभूषा स्पर्धा, भव्य लकी ड्रॉ स्पर्धासह विविध स्पर्धा ; आकर्षक बक्षिसांची मांदियाळी

मालवण | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दसऱ्या निमित्ताने मागील वर्षी मालवणात घेण्यात आलेल्या खुल्या गरबा नृत्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यंदाही दसऱ्याचे औचित्य साधून मनसेच्या वतीने २४ ऑक्टोबर रोजी मालवणच्या बंदर जेटीवर भव्य खुल्या गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वेशभूषा स्पर्धा, भव्य लकी ड्रॉ स्पर्धासह विविध स्पर्धा होणार असून आकर्षक बक्षिसांची मांदियाळी ठेवण्यात आली आहे.

मालवणी समलोचनासाठी प्रसिद्ध असणारे बादल चौधरी यांच्या खास मालवणी शैलीत या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन होणार आहे. तरी मालवण वासीयांनी गेल्यावर्षी प्रमाणे यंदा देखील आवर्जून ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!