पंतप्रधानांच्या मालवण दौऱ्याच्या अनुषंगाने मालवणात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्या…

भाजपाच्या शिष्टमंडळाची पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंच्या माध्यमातून मालवण शहराला आवश्यक निधी देण्यासाठी प्रयत्न

मालवण | कुणाल मांजरेकर

येथील किल्ले सिंधुदुर्गवर ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या नौडलं दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मालवण शहरात आगमन होणार आहे .या निमित्त मालवण शहरात आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यासाठी व यानिमित्ताने येणाऱ्या पर्यटकांना मालवण शहर पर्यटन दृष्ट्या आकर्षित होण्यासाठी आवश्यक सुविधा व उपलब्ध होण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून शहरातील विविध विकास कामांसाठी आवश्यक असलेला निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

या भेटीमध्ये राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या होत असलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी लाईट लेझर साऊंड शो प्रस्तावित करावा, मालवण शहरात ताराराणी व छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला ते कर्नाटक बस्नुर अशी सागरी यात्रा केली होती. या विषयाला धरून अत्याधुनिक आर्ट गॅलरी करण्यात यावी. यासाठी मालवण नगरपालिकेने तात्काळ सिंधूरत्न योजनेमध्ये निधीची मागणी करून प्रकल्प सादर करण्यात यावा. तसेच मालवण शहरांमध्ये मालवण नगरपालिकेच्या वतीने रंगरंगोटी करून देण्यात यावी. मालवण बंदर जेटी ते राजकोट बंधारा कम रस्ता कामास सुरुवात करण्यात यावी. जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेले मालवण शहरातील सतरा रस्ते ताबडतोब डांबरीकरण करण्यास घ्यावे. मालवण शहरातील गटारांवर तात्काळ लाद्या बसवण्यात याव्यात. मोरयाचा धोंडा ते राजकोट पर्यंतचे समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात यावेत. त्यासाठी आवश्यक स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. किनारपट्टीवरील लाईटची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी. त्यासाठी विस्तृत चर्चा करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी यांनी किनारे साफ करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी निधी उपलब्ध व्हावा. तसेच मोठ्या टायरचा ट्रॅक्टर मंजूर झाल्यास किनारपट्टी स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही. तसेच मालवण नगरपालिकेच्या सभागृहाला आधुनिक सुविधा युक्त करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रयत्न करावेत अशी विनंती केली. यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपा नेते निलेश राणे यांच्या सूचनेस अनुसरून आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासंदर्भात ताबडतोब प्रस्ताव सादर करावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. पालकमंत्री यांच्याशी फोनवरून संभाषण होता प्रस्ताव ताबडतोब देऊन निधी उपलब्ध करून देऊ यात कोणती शंका नसावी असा शब्द देण्यात आला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाने आवश्यक असणाऱ्या सुविधा मालवण नगरपालिका यांनी तात्काळ करून घ्याव्यात यासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे अभिवचन देण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर तसेच माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, अशोक तोडणकर, पंकज साधये, भाजपा महिला तालुकाध्यक्ष सौ. पूजा करलकर, सौ. पूजा सरकारे, आबा हडकर , ललित चव्हाण, संदीप मालडकर आदी उपस्थित होते. मालवण नगरपालिकेच्या वतीने बांधकाम विभागाच्या श्रीमती सोनाली हळदणकर, वरिष्ठ लिपिक महेश परब व सुधाकर पाटकर उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!