भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्गज नेते उद्या सावंतवाडीत !
केंद्रीयमंत्री नारायण राणे, श्रीपाद नाईक, भागवत कराड यांच्यासह उदय सामंत, दीपक केसरकर, खा. सदानंद तानावडे, आ. चंद्रकांत शेटये, माजी खा. निलेश राणे, आ. नितेश राणे यांसह दिग्गजांची उपस्थिती
प्रसिद्ध गायक जुबीन नौटीयाल यांचा महाराष्ट्र, गोव्यातील पहिला लाईव्ह कॉन्सर्ट अनुभवण्याची पर्वणी
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रचे युवा नेते, तथा युवा उद्योजक विशाल परब यांचा ३६ वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उद्या १५ ऑक्टोंबरला सायंकाळी ५ वाजता सावंतवाडी जिमखाना मैदानावर संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे अनेक मान्यवर मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. या अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांचा महाराष्ट्र, गोव्यातील पहिला
लाईव्ह कॉन्सर्ट शो याठिकाणी साजरा होणार आहे. त्यामुळे या सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या कार्यक्रमासाठी भव्य दिव्य असे २४ हजार स्क्वेअर फुटचे स्टेज उभारण्यात आले आहे. तसेच ५० हजारहून अधिक रसिक या सोहळ्याला उपस्थित राहतील, अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सिंगर जुबिन नौटियाल येत आहे. त्यामुळे गोवा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर बेळगाव आधी भागातून रसिक प्रेक्षक या सोहळ्यासाठी येणार आहेत. त्यामुळे या शोसाठी मोठी गर्दी होणार असल्याचे लक्षात घेऊन तसे नियोजन करण्यात आले आहे. या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे, श्रीपाद नाईक, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर, गोव्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद तानावडे, आमदार चंद्रकांत शेटये, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विशाल परब मित्रमंडळाने केले आहे.