शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने उद्यापासून मालवणात महिलांसाठी खुल्या गरबा

नऊ दिवस चालणार नवदुर्गांचा सोहळा ; खेळ पैठणीचा, महिला वेषभूषा स्पर्धांसह भरगच्च कार्यक्रम

लहान मुलांसाठी फनी गेम्स, वेशभूषा स्पर्धा यांसह इतर धमाल कार्यक्रम

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण येथील सामाजिक कार्यकर्त्या, शिवसेना ठाकरे गटाच्या युवतीसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख समन्वयक सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रौत्सवानिमित्त महिलांसाठी खुल्या गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने नऊ दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये खेळ पैठणीचा, महिला वेषभूषा स्पर्धांसह लहान मुलांसाठी फनी गेम्स, वेशभूषा स्पर्धा आणि इतर धमाल कार्यक्रमांचा समावेश आहे. रविवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता या कार्यक्रमांचा उदघाट्न सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती सौ. खोत यांनी दिली. धुरीवाडा येथे माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या निवासस्थानानजिक हे कार्यक्रम होणार आहेत.

सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या माध्यमातून दरवर्षी महिलांसाठी गरबा नृत्य कार्यक्रम घेण्यात येतात. यावर्षीचे हे दहावे वर्ष आहे. यानिमित्ताने नारीशक्तीचा विशेष सन्मान केला जाणार आहे. तरी या सोहळ्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सौ. शिल्पा यतीन खोत यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!