भाजपच्या सेवा सप्ताहा निमित्त मालवणात सफाई कामगारांची आरोग्य तपासणी
भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून पुढील उपचार व आवश्यक औषध पुरवठा होणार
मालवण : भारतीय जनता पार्टी सेवा सप्ताह निमित्त मालवण तालुक्याच्या वतीने सफाई कामगारांसाठी येथील भाजपा कार्यालयात मधुमेह, लिव्हर, किडनी, हिमोग्लोबिन तपासण्याचे शिबिर घेण्यात आले. के.जी. डायग्नोस्टीक लॅब मालवण यांच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे , ललित चव्हाण, महेश सारंग आदी उपस्थित होते. के. जी. डायग्नोस्टिक लॅब मार्फत संचालक किरण प्रकाश गोसावी तसेच गौरी मेस्त्री व प्रीती केळुस्कर यांनी सहकार्य केले. सर्व कामगारांचे रिपोर्ट मुख्याधिकारी नगरपालिका यांच्याकडे सुपूर्द करणार असून ज्या कामगारांना आवश्यक ट्रीटमेंटची जरुरी असेल किंवा औषधाची जरुरी असेल त्यांना भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा संयोजक निलेश राणे यांच्या सहकार्याने औषध पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती विजय केनवडेकर यांनी दिली.