प्रख्यात निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर प्रथमच कोकण दौऱ्यावर ; उद्या मालवणात विशेष कार्यक्रम
मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या वतीने घरगुती उपचारावर मोफत मार्गदर्शन शिबीर
जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा ; मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचे आवाहन
मालवण : निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर प्रथमच कोकण दौर्यावर येत असून रविवारी १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वा. मामा वरेरकर नाट्यगृहात मनसे नेते परशुराम उपरकर यांच्यावतीने आरोग्य धनसंपदा या हसत खेळत घरगुती उपचाराचे मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी घरगुती उपचाराच्या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केले आहे.
अनेक छोट्या छोट्या आजारांसाठी लोकांना डॉक्टरकडे धाव घ्यावी लागते. मात्र याच आजारांवर औषधी वनस्पतीच्या आधारे घरगुती उपाय करता येतात. यावर तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते निसर्गोपचार तज्ज्ञ व व्याख्याते स्वागत तोडकर हे मार्गदर्शन करणार आहेत, वर्षानुवर्षे असलेले अनेक छोट्या मोठ्या आजारांवर उपचाराची सोय दिसून येत नाही. या आजारांवरील उपचारसाठी लोकांना डॉक्टरकडेच जावे लागते.त्यामुळे ही बाब खर्चिकही पडते.त्यामुळे काही घरगुती उपायांमुळे काही आजार बरे होत असतील तर लोकांचा खर्च वाचेल. त्यामुळे या उपायांविषयी लोकांना माहिती देणे गरजेचे आहे,त्यांदृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन मनसे नेते परशुराम उपरकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमित इब्रामपूरकर यांनी केले आहे