तारकर्ली समुद्रात कणकवलीचा युवक बुडाला ; दुसऱ्याला बाहेर काढण्यात यश

मालवण : तारकर्ली पर्यटन केंद्रानजिकच्या समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक बुडून बेपत्ता झाला आहे. तर त्याचा अन्य एक सहकारी अत्यवस्थ असून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. सैफियान दिलदार शेख (वय- २४) रा. साकेडी मुस्लिमवाडी कणकवली असे बेपत्ता युवकाचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार साकेडी मुस्लिमवाडी येथील सैफियान दिलदार शेख, साहिल इरफान शेख, सावेज रियाज शेख, अरबाज इम्तियाज शेख, मतीन बबलू शेख, कतील नाझीम काझी, उस्मान काझी, युसुफ काझी, साहिल शेख, जयद शेख हे सर्वजण आज दुपारी दुचाकीने तारकर्ली पर्यटन केंद्र येथे आले होते. सायंकाळी साडेतीन पावणे चार वाजण्याच्या दरम्यान ते समुद्रात स्नानासाठी उतरले. यात पाण्याचा अंदाज न आल्याने सैफियान शेख हा बुडून बेपत्ता झाला तर मतीन शेख याला बुडण्यापासून वाचविण्यात आले. त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉ. शिवप्रसाद तेली, डॉ. पळसंबकर यांनी उपचार केले. मात्र तो अत्यवस्थ बनल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सुनील जाधव, सुभाष शिवगण, धोंडू जानकर यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन माहिती घेतली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!