कुडाळ- मालवण मतदार संघात रस्ते दुरुस्तीसाठी ७ कोटी २८ लक्ष निधी उपलब्ध
भाजपा नेते निलेश राणे यांनी वेधले होते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष.
मालवण : राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर कुडाळ मालवण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध झाला असून आज पुन्हा नव्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून विशेष दुरुस्ती अंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील कसाल मालवण रस्ता रा. मा. १८२, मालवण वायरी तारकर्ली देवबाग रस्ता प्रजिमा-१८, चौके धामापूर रस्ता प्रजिमा-४१ व आचरा विजयदुर्ग रस्ता प्ररामा-४ या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एकूण ७ कोटी ८२ लक्ष एवढा निधी उपलब्ध झाला आहे.
कुडाळ व मालवण तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग तसेच राज्य मार्ग हे खड्डेमय झाले होते या पार्श्वभूमीवर भाजपा कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रभारी निलेश राणे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्याजवळ या नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष दुरुस्ती अंतर्गत निधी देण्याची मागणी केली होती, त्यानुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ७ कोटी २८ लक्ष एवढा निधी विशेष दुरुस्ती अंतर्गत मंजूर केला आहे.