भाजपाच्या माध्यमातून वडाचापाट शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप

प्रशालेच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रा. पं. च्यावतीने सर्वातोपरी सहकार्य : सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई

मसुरे : पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने वडाचापाट प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्या वाटप करण्यात आले. या प्रशालेच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई यांनी दिली.

यावेळी उपसरपंच सचिन पाताडे, माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, ग्रामपंचायत सदस्य विनायक प्रभुदेसाई, सविता पालव, विराज पाटकर, शामल मांजरेकर, दर्शना कासले, वेदिका माळकर, श्रीकांत पाटकर, विजय घाडीगावकर, रामचंद्र कासले, भानुदय कासले, दया देसाई, मुख्याध्यापिका सौ माळकर, शिक्षक सौ. पालव, श्री पवार आदीसह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!