चिंदर ग्रा. पं. च्या सरपंचपदी भाजपाच्या नम्रता शंकर महांकाळ बिनविरोध
मालवण : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपच्या नम्रता शंकर महांकाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
चिंदर ग्रा. पं. च्या सरपंच राजश्री कोदे यांनी अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पक्षीय धोरणानुसार राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी बुधवारी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. या पदासाठी भाजपच्या नम्रता शंकर महांकाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड प्रक्रियेच्यावेळी ११ पैकी ७ सदस्य उपस्थित होते. या निवडणूकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून संजय गोसावी, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर यांनी काम पाहिले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालूकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, सदस्य महेंद्र मांजरेकर, शशिकांत नाटेकर, सानिका चिंदरकर, दुर्वा पडवळ, जान्हवी घाडी, रिया घागरे, माजी सभापती हिमाली अमरे, संतोष गावकर, देवेंद्र हडकर, ग्रामस्थ उपस्थित होते.