घुमडे येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत रवळनाथ प्रा. भजन मंडळ पिंगुळी कुडाळ प्रथम

गांगेश्वरकृपा प्रा. भजन मंडळ श्रावण द्वितीय तर श्री भगवती प्रा. भजन मंडळ बांव कुडाळ तृतीय क्रमांकांचे मानकरी

“श्रावणधारा” निमित्त घुमडाई मंदिरात आयोजित विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण संपन्न

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात श्रावणी मंगळवार निमित्त आयोजित “श्रावणधारा” कार्यक्रमा निमित्ताने गुरुवर्य भजनसम्राट कै. पंढरीनाथ घाडीगांवकर यांच्या स्मरणार्थ घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित व उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत घेण्यात आलेल्या निमंत्रित भजनी मंडळांच्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी तृतीय यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर गांगेश्वरकृपा प्रासादिक भजन मंडळ श्रावण आणि श्री भगवती प्रासादिक भजन मंडळ बांव कुडाळ यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत लक्ष्मीनारायण भजन मंडळ वालावल आणि दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी यांनी उत्तेजनार्थ प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आणि अभंग महिला भजन मंडळ यांना विशेष कौतुकास्पद बक्षीसे देण्यात आली. मंगळवारी रात्री मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

प्रथम तीन क्रमांकांना ११,१११ रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह, ७,७७७ रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह आणि ५,५५५ रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. तर उत्तेजनार्थ प्रथम दोन क्रमांकांना ३,३३३ रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह, २,२२२ रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. विशेष कौतुकास्पद मंडळाना प्रत्येकी १,१११ रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

घुमडाई मंदिरात ही भजन स्पर्धा घेण्यात आली. उद्योजक दत्ता सामंत यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी रात्री संपन्न झाला. यावेळी उद्योजक दत्ता सामंत यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून वृद्ध कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष कानडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, उद्योजक बाळा गोसावी, परीक्षक भालचंद्र केळूसकर, गजानन देसाई, संजय केळूसकर, सरपंच स्नेहल बिरमोळे, उपसरपंच राजू सावंत, दादा साईल, विकास कुडाळकर, राजू बिरमोळे, आमडोस सरपंच सौ. सुबोधिनी परब, माजी सरपंच राधा वरवडेकर, महादेव बिरमोळे, उमेश देसाई, पोलीस उपनिरीक्षक भगवान खोत, रुपेश तवटे, गोपी लाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजा सामंत यांनी केले. या स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित १३ संघ सहभागी झाले होते.

या भजन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कोरस – श्री देवी हेंदूबाई प्रासादिक भजन मंडळ, खुडी देवगड (१,१११ रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक), सर्वोत्कृष्ट तालरक्षक – परेश परब – श्री देव रवळनाथ उत्कर्ष भजन मंडळ, ओरोस बुद्रुक – (१,१११ रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक), सर्वोत्कृष्ट मृदंगमणी – प्रथमेश राणे – स्वरसाधना संगित भजन मंडळ कडावल – (१,१११ रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक), सर्वोत्कृष्ट गायक – रूपेश येमकर – श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी- कुडाळ- (१,१११ रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक) यांचा सन्मान करण्यात आला.

फुगडी स्पर्धेचे बक्षीस वितरण

श्रावणधारा कार्यक्रमा अंतर्गत घुमडाई मंदिरात दत्ता सामंत पुरस्कृत फुगडी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत भैरव जोगेश्वरी फुगडी संघ कुडाळ यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर सखी फुगडी संघ पावशी व सुंदरवाडी फुगडी संघ बोर्डवे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ७,७७७ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, ५,५५५ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, ३,३३३ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत बिरमोळे, उमेश बिरमाळे, दिलिप बिरमोळे, योगेश सामंत, भाऊ सामंत, रविंद्र बिरमोळे, गणपत बिरमोळे, अंकित बिरमोळे, कुणाल बिरमोळे, भाऊ सावंत, उमेश परब, आबा बिरमोळे, भुषण गावडे, सुभाष गावडे, सुरज राणे, सुमित राणे, अमित राणे, राजा बिरमोळे, मयुर बिरमोळे, निहार टेंबुलकर, सुनिल टेंबुलकर, संकेत बिरमोळे, गोटया राणे, बाळु पारकर, संदेश राणे, योगेश वस्त, दिनेश भाईप, संतोष गावडे, दत्तु बिरमोडे, उत्कषा चव्हाण यांनी मोलाचे योगदान दिले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!