गो मातेची सेवा करीत वाढदिवस केला साजरा

अमेय देसाई आणि सहकाऱ्यांचा मालवणात आदर्शवत उपक्रम

मालवण | कुणाल मांजरेकर

विविध समाजोपयोगी उपक्रमात पुढे असणाऱ्या युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय आनंद देसाई यांनी स्वतःचा वाढदिवस सहकारी मित्रांसमवेत गो मातेची सेवा करीत अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. वाढदिनी पुण्याचे काम करावे या हेतूने बरेच दिवस पायाच्या आजाराने त्रस्त असलेल्या गाईवर श्री. देसाई यांनी सहकारी मित्र परिवाराच्या सहाय्याने उपचार करून या गाईला सरंबळ येथील गो शाखेत दाखल केले. त्यांच्या या कार्याचे कौतुक केले.

मालवण बाजारपेठ येथील अमेय देसाई हे विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सातत्याने सेवाकार्य करीत असतात. मंगळवारी वाढदिवसाच्या निमित्ताने एखादे पुण्याचे काम करावे, या उदेशाने मालवण बाजारपेठ मध्ये पायाच्या आजाराने त्रस्त असलेल्या व बाजारपेठेतील रहदारीला अडथळा होणाऱ्या गाईच्या पायावर उपचार करून तिला त्यांनी सरंबळ गो शाळा येथे सोडले. ही मोकाट गाय मालवण बाजारपेठ येथे बरीच वर्षे पायाची गेळे (नखे) वाढण्याच्या आजाराने त्रस्त होती. काही वर्षापूर्वी एकदा तिची गेळे कट करून घेतली. पण ती पुन्हा वाढतच राहत. त्यावर एक कायमस्वरूपी उपाय करण्याच्या उदेशाने मालवण मधील युवकांनी पुढाकार घेतला आणि त्यावर तोडगा काढला व त्या गाईला पायावर उपचार करून तिला गोशाळेत नेऊन ठेवण्यात आले. त्यासाठी डॉ. परब सर सरंबळ गो शाळा तसेच शैलेश नामनाईक, सीझर डिसोझा, राजा शंकरदास, राजेश पारधी, केदार देसाई, आनंद देसाई, महादेव पाटकर, मंदार ओरसकर, अंतोन काळसेकर, दर्शन गावकर, तुषार मेस्त्री, संतोष माणगवकर आणि नालबंद मोईन दिलावर यांचे सहकार्य लाभले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!