डास प्रतिबंधक फवारणीसाठी अखेर मालवण शहरात फॉगिंग मशीन दाखल…
भाजपचे युवा नेतृत्व सौरभ ताम्हणकर यांनी वेधले होते मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष
मालवण : जिल्ह्यातील काही शहरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता पालिकेच्या वतीने शहरात डास प्रतिबंधक फवारणी साठी पालिकेच्या वतीने फॉगिंग मशीन उपलब्ध करण्यात आली आहे. भाजपाचे युवा नेतृत्व सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी याबाबत सर्वप्रथम पालिकेचे लक्ष वेधले होते.
मालवण शहरात डासांचा मोठा प्रादुर्भाव झाला असून शहरात डेंग्यूचा फैलाव होऊ नये यासाठी सौरभ ताम्हणकर यांनी ऑगस्ट महिन्यात मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले होते. यावेळी मुख्याधिकारी यांनी डास फवारणी व अन्य उपाययोजना सोबत फॉगिंग मशीन लवकर उपलब्ध होईल आश्वासन दिले होते. शहरातील अन्य आजी माजी लोकप्रतिनिधी यांनीही याबाबत पालिका प्रशासनाकडे मागणी केली होती. अलीकडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यू रुग्ण मिळून आल्यावर देखील सौरभ ताम्हणकर यांनी पुन्हा एकदा मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. यावर दोन दिवसात फॉगिंग मशीन उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले होते. अखेर मंगळवारी मालवण नगरपालिका येथे फॉगिंग मशीन दाखल झाली. शहरात डास फवारणीसाठी ही मशीन कार्यान्वित केली जाणार आहे. असे मुख्याधिकारी यांनी सांगितले. मुख्याधिकाऱ्यांनी जनहिताच्या दृष्टीने तात्काळ करत फॉगिंग मशीन उपलब्ध केल्याबाबत सौरभ ताम्हणकर यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले आहे. पालिका येथे फॉगिंग मशीन दाखल झाली त्यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, पालिका कर्मचारी तसेच सौरभ ताम्हणकर उपस्थित होते.