श्रावणधारा निमित्त उद्या (गुरुवारी) घुमडाई मंदिरात लघुरुद्र, महाप्रसाद
भाविकांनी लाभ घेण्याचे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्ता सामंत यांचे आवाहन
मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात सुरु असलेल्या श्रावणधारा उत्सवानिमित्ताने उद्या मंदिरात लघुरुद्र, महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ८ वाजता लघुरुद्र सुरु होणार असून दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी मंदिरात स्थानिक भजने आयोजित करण्यात आली आहेत. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष उद्योजक दत्ता सामंत यांनी केले आहे.