एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद आणि निलेश राणेंच्या मंत्रीपदासाठी महिला शिवसैनिकांचे रामेश्वराला साकडे
मालवण तालुका शिवसेना महिला आघाडीचा पुढाकार
मालवण | कुणाल मांजरेकर
राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप अद्याप सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांना मंत्री पद मिळण्यासाठी शिवसेना मालवण तालुका महिला आघाडीच्या वतीने मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला सोमवारी साकडे घालण्यात आले.
यावेळी शिवसेन्स महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक अंजना सामंत, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, तालुका समन्वयक कविता मोंडकर, उपतालुकाप्रमुख प्रियांका मेस्त्री, प्रियांका कुमावत, शहर प्रमुख क्रांती धुरी, उपशहरप्रमुख योगिता साळुंखे, विभागप्रमुख निकिता तोडणकर, उपविभागप्रमुख रिया कुबल, प्रणिता रेवंडकर, श्रेया धुरी, रेश्मा गौडार, शाखाप्रमुख लुड्डीन फर्नांडीस, रुचिता हडकर, स्वप्नाली सावजी, सुनंदा आचरेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या