आ. वैभव नाईक यांची मालवण ग्रामीण रुग्णालयात भेट ; सोयी सुविधांचा घेतला आढावा

आवश्यक सुविधा पुरविण्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या सुचना

मालवण : आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी मालवण ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व मालवणचे वैद्यकीय अधिकारी संजय पोळ यांच्याकडून सोयी सुविधांबाबत आढावा घेतला. यावेळी रुग्णालयाला आवश्यक सुविधा पुरविण्याच्या सुचना त्यांनी केल्या. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा आराखडा तयार करून प्रस्ताव करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रुग्णालयात आवश्यक असलेला औषध पुरवठा देखील वेळेवर आणि सुलभरित्या व्हावा अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी केली. डॉ. श्रीपाद पाटील यांनी ही मागणी तात्काळ मान्य केली.

आ. वैभव नाईक यांनी डॉ. श्रीपाद पाटील व डॉ. संजय पोळ यांच्याशी चर्चा करताना नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आठवड्यातून एक दिवस नेत्र चिकित्सक उपलब्ध करण्यात यावा. एक डायलेसीस सेंटर सूरु आहे त्याचबरोबर आणखी एक डायलेसीस सेंटर सुरु करण्यात यावे. रुग्णालयात कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची जी पदे रिक्त आहेत त्याठिकाणी कंत्राटी कर्मचारी नेमण्यात यावेत. अशा सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या.

पोस्टमार्टम विभागातील सुविधांकडे आ.वैभव नाईक यांनी लक्ष वेधले. याठिकाणी शेड उभारण्याची मागणी त्यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे त्यांनी केली आहे. याप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे, डॉ. श्री. पळसंबकर, डॉ. श्री. वस्त, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना मालवण शहरप्रमुख मंदार ओरसकर, महेश जावकर, सन्मेष परब, तपस्वी मयेकर, स्वप्नील आचरेकर, नरेश हुले, मनोज मोंडकर, राहुल परब, सिद्धेश मांजरेकर, महेंद्र म्हाडगूत आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!