वराड कावळेवाडी येथील आरोग्य शिबिराचा १६७ जणांनी घेतला लाभ

सहकारमहर्षी डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजन 

मालवण : सहकारमहर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामविकास मंडळ कावळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्याने वराड कावळेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा १६७ जणांनी लाभ घेतला.

सहकारमहर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम स्मृतीस्थळ कावळेवाडी वराड येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबिरात हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, यूरोलॉजी तपासणी, अस्थिरोग तपासणी, जनरल सर्जरी, नेफ्रोलॉजी तपासणी, कर्करोग तपासणी, दंतरोग चिकित्सा, प्रसुतीशास्त्र आणि स्त्री रोग तपासणी,  मोफत रक्त तपासणी, इसीजी व मोफत औषधे देण्यात आली. या शिबिराचा मालवण, वराड, कट्टा, नांदोस, गुरामवाडी, कावळेवाडी या भागातील सुमारे १६७ गरजू  ग्रामस्थांनी लाभ घेतला. यावेळी कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामविकास मंडळ कावळेवाडी तसेच समस्त ढोलम कुटुंबीय यांच्यावतीने प्रा. डी. बी. ढोलम यांचे समाजकार्य कायमस्वरूपी पुढे सुरू ठेवण्यासाठी यापुढेही उपक्रम राबविले जातील असे सांगितले. 

यावेळी देवेन (पप्पू) ढोलम, कै डी बी ढोलम यांच्या मुली बेबी, रेखा, मनीषा, दादा रावले, महादेव मलये, अनिल फणसेकर, छोटू ढोलम, बाबा ढोलम, अवधूत चव्हाण, सुनील पोखरणकर, प्रणेश ढोलम, गणपत पोखरणकर, नितेश खडपे, विकास लुडबे, नितीन लुडबे, आश्विन ढोलम, अनिल चव्हाण, परमानंद वेंगुर्लेकर, सतीश वेंगुर्लेकर, योगेश वेंगुर्लेकर, अवधूत वेंगुर्लेकर, रोहन चव्हाण, प्रेम परब, दिलीप वेंगुर्लेकर,  डॉ.प्रथमेश वालावलकर, समीर रावले, प्रवीण मीठबावकर, सागर चव्हाण, ऍड. प्रदीप मिठबावकर, गणेश वाईरकर, वंदेश ढोलम, प्रसाद शिरोडकर, शिवा शिरोडकर, विनू चव्हाण तसेच कै. डी.बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामविकास मंडळ कावळेवाडीचे सदस्य व कावळेवाडी लुडबेवाडीतील ग्रामस्थ आणि महिला वर्ग यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3863

Leave a Reply

error: Content is protected !!