… होय धोंडी चिंदरकरांच्या म्हणण्यात तथ्य ; निलेश राणेंचा “पॉलिटिकल एन्काऊंटर” करण्याचा प्रयत्न !

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची प्रतिक्रिया ; पक्षप्रवेशाचे धडाके आभासी ठरलेत की काय ?

मालवण | कुणाल मांजरेकर

कुडाळ मालवणच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांचा पॉलिटिकल एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय भाजपाचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मंगळवारी व्यक्त केला होता. त्यांच्या या विधानाला मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी समर्थन दर्शवले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदार संघात मिळालेल्या मताधिक्याच्या तुलनेत विधानसभा निवडणुकी मिळालेले अल्प मताधिक्य याचा विचार करता, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या म्हणने योग्यच वाटते. लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ व मालवण तालुक्यांमध्ये पक्षप्रवेशांचे धडाके  लावले गेले ते आभासी पक्षप्रवेश ठरलेत की काय ? असा सवाल त्यांनी केला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. परब यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत पॉलिटिकल एन्काऊंटर करणारी टिमच कार्यरत होती. आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडुन तशा बातम्या पण समजत होत्या. निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी एका पदाधिकाऱ्यांसोबत हा विषय पण आम्ही चर्चीला होता. तो आज पण पुरावा म्हणून आहे. पण आता चिंदरकरांच्या जाहीर प्रेसमुळे याला दुजोरा द्यावासा वाटला. २०१९ ला फुल फ्लेश काम करणारी मंडळी २०२४ या वेळेस डिम होती. प्रचार यंत्रणेत अंग राखून होती, काही विशिष्टांकरवी व्हाट्सअपवर विरोधी मोहीम राबवली जात होती. बाजुच्या जिल्ह्याच्या प्रचार यंत्रणा तेथील उमेदवार हे महत्वाचे वाटत होते. अशा पण सर्व चर्चा ऐकु येत होत्या. भविष्यात ही जागा रिकामी राहील्यास आपल्या, आपल्या माणसाचा नंबर इथे लागु शकेल असं पण काही मंडळीचं मत होतं. योग्य उमेदवारालाच मतदान करा हा !! अशी फोनाफोनी केल्याच्या घटना सुद्धा समजत होत्या. एकंदरीत समर्थकांच्या मनामधे चलबिचलपणा करुन कोण, कोण संधी शोधतोय ? हे शोधुन काढणं हे चिंदरकर यांच्या आरोपांमुळे आता महत्वाचं झालं आहे. राणेंचं वलय वापरुन आता ही टिम आपल्या माणसांसाठी वेगळं लाॅबिग आणि राणेसाठी वेगळं लाॅबिग करते. याचा अभ्यास आता महायुतीतील सर्वानीच करावा, असे धीरज परब यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3863

Leave a Reply

error: Content is protected !!