कोळंबमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ६२ जणांनी केले रक्तदान

ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि कोळंब पंचक्रोशी मालवण यांच्यावतीने हॉटेल मालवणी येथे आयोजन ; रक्तदानात महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग

मालवण | कुणाल मांजरेकर

ग्रामीण भागात रक्तदानाबाबत जनजागृती होण्याच्या उद्देशाने ग्लोबल रक्तदाते मालवण, सिंधुदुर्ग आणि कोळंब पंचक्रोशी मालवण यांच्या वतीने कोळंब येथील हॉटेल मालवणी येथे आयोजित रक्तदान शिबिरात ६२ रक्तदात्यानी रक्तदान केले. रक्तदानात महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. रक्तदान शिबिर आयोजनात हॉटेल मालवणी आणि लायन्स क्लब मालवण यांचे सहकार्य लाभले.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य सौ. नंदा गावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, लायन्स क्लब अध्यक्ष विश्वास गावकर, रोटरी क्लब अध्यक्ष अभय कदम, उद्योजक अवी नेरकर, विनायक धुरी, लाड सर, मंगेश चव्हाण, विशाल फणसेकर, डॉ. प्रशांत पवार, डॉ. गार्गी ओरसकर, आबा भोजने, महेश कुर्ले, प्रवीण देसाई, प्रदीप कुर्लेकर, सचिन तळाशिलकर, यांसह राजेंद्र पराडकर निवृत्त उप मुख्य अधिकारी सिंधुदुर्ग, गुरुनाथ तीरपनकर (जनजागृती समिती बदलापूर) लायन्स क्लब अध्यक्ष विश्वास गावकर, उमेश शिरोडकर, सौ. पल्लवी खानोलकर, सौ. वैशाली शंकरदास, सौ.अनुष्का चव्हाण, सौ नंदिनी गावकर, सौ.दीक्षा गावकर, सौ. राधिका मोंडकर, सौ. रुपा कुडाळकर यांसह सर्व ग्लोबल रक्त संघटक मालवण राजू बिडये, राजा शंकरदास, अमेय देसाई, विकास पांचाळ, अंकुश कातवणकर, सौ. राधा गोविंद केरकर, सौ. कविता वेंगुर्लेकर, निलेश गवंडी, तेजस नार्वेकर, संदीप पेडणेकर, प्रियाल लोके, स्वाती सावंत, सौ.भूमिका म्हापणकर, सौ. शीतल साठे, विजय पांचाळ आणि रक्तमित्र परिवार उपस्थित होता. ओरोस रक्तपेढी सिंधुदुर्ग स्टाफ डॉ. सुशील परब, सुरेश डोंगरे, निरुकीकर, प्रांजली परब, मयुरी शिंदे, नितीन गावकर यांचे सहाय्य लाभले. अमित खोत, महेंद्र पराडकर, तेजस निव्हेकर, प्रमुख आयोजक हॉटेल मालवणीचे मालक गणेश कोळंबकर व सौ.नेहा कोळंबकर, डॅनिश लुगेरा, सौ. प्रज्ञा लुगेरा या उभयतांनी रक्तदान केले. सत्यवान बापूसाहेब खोंगे पाटिल (हॉटेल मालवणी स्टाफ) यांनी या शिबिरात आपले वैयक्तिक ५० वे रक्तदान केले.

हॉटेल मालवणीचे सर्वेसर्वा तथा ग्लोबल संघटक गणेश कोळंबकर व सौ. नेहा कोळंबकर यांचा मुलगा आराध्य याचा वाढदिवस आजच असल्याने सर्व रक्तमित्र परिवाराने केक कापून वाढदिवस साजरा केला. सामाजिक कार्यकर्ते मंगेश उर्फ बाबू ढोले यांचाही यावेळी ग्लोबल परिवारातर्फे सन्मान करण्यात आला.

सर्व रक्तदाते आणि पंचक्रोशी कोळंब उपस्थित सर्व मान्यवरांचे ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदूर्ग परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले. सर्व मान्यवर यांचे रोपे देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला. तसेच सर्व रक्तदात्याना सन्मानचिन्ह संस्थेच्या वतीने देण्यात आली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!