मसुरे गडघेरा ग्रामस्थांसाठी दत्ता सामंत ठरले “देवदूत” !

गडघेरा दत्तामंदिरा नजिकचा ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगसाठी आवश्यक अडीच लाखांचा निधी स्वतःच्या खिशातून दिला…

ग्रामस्थांची तब्बल १० वर्षांपासून होती मागणी ; आमदार, खासदारां सह प्रशासनाकडे देखील केला होता पाठपुरावा

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील मसुरे गडघेरा ग्रामस्थांसाठी भाजपा नेते दत्ता सामंत हे देवदूत ठरले आहेत. गेली दहा वर्षे मसुरे गडघेरावाडी दत्त मंदिर येथील प्रलंबित असलेला ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगचा प्रश्न दत्ता सामंत यांनी पहिल्याच भेटीदरम्यान भाजपाच्या माध्यमातून त्वरित दूर केला आहे. यासाठी दत्ता सामंत यांनी स्वतः सुमारे अडीच लाख रुपये स्वतः खर्च करून वीज वितरणच्या ठेकेदारास येथील ग्रामस्थांचा ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगचा प्रश्न येत्या गणेश चतुर्थीपूर्वी सोडविण्याची सूचना केली. याबाबत येथील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

गेली दहा वर्षे येथील ग्रामस्थांनी आमदार, खासदार, प्रशासनाकडे या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र तरीही हा प्रश्न सुटत नव्हता. ग्रामस्थांच्या वतीने माजी जि. प. अध्यक्ष सरोज परब, शिवाजी परब, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, महेश बागवे, माजी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर तसेच स्थानिक ग्रामस्थांनी दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले होते. यावेळी मसुरे भेटी दरम्यान दत्ता सामंत यांनी या ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून या प्रश्नासाठी लागणारा अडीच लाख रुपयांचा निधी स्वखर्चातून संबंधित ठेकेदारास देऊन हे काम येत्या गणेश चतुर्थीपूर्वी पूर्ण करून देण्याचे सांगितले. एखाद्या देवदूताप्रमाणे दत्ता सामंत यांनी एका शब्दातच येथील वाडीचा गेली कित्येक वर्ष प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडविल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी दत्ता सामंत आणि भारतीय जनता पक्षाचे आभार मानले आहेत. यावेळी स्थानिक ग्रामस्थांच्या समोरच दत्ता सामंत यांनी ठेकेदारास पैसे सुपूर्द केले. संबंधित ठेकेदाराने येत्या काही दिवसात हे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी दत्ता सामंत यांच्यासोबत भटक्या विमुक्त जातीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा गोसावी, माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाई मांजरेकर, सरोज परब, शिवाजी परब, महेश बागवे, संतोष पालव, जगदीश चव्हाण, प्रमोद बागवे, सुरेश शिंगरे, हिरबा तोंडवळकर, संकेत परब, लक्ष्मण शिंगरे, इशू तोंडवळकर, छोटू ठाकूर, पुरुषोत्तम शिंगरे, श्री. मेस्त्री, तात्या हिंदळेकर, अना भोगले, श्री. सावंत, श्री. शिंगरे, श्री तोंडवळकर आणि स्थानिक ग्रामस्थ व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते..

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!