मसुरे येथील नारळ लढवण्याच्या स्पर्धेत किरण मेस्त्री विजेता

भार्गव वरक उपविजतेपदाचा मानकरी ; युवासेना मसुरे विभागाच्या वतीने आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर : युवासेना मसुरे विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत किरण मेस्त्री विजेता ठरला तर भार्गव वरक उपविजेते पदाचा मानकरी ठरला.या स्पर्धेत १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून युवासेना मसुरे विभागाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रत्येक स्पर्धकाला ५ नारळ देऊन स्पर्धा आयोजित केली गेली. मुंबई सुधार समिती अध्यक्ष व वांद्रे विधानसभा प्रमुख सदा परब यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तर युवासेना जिल्हाप्रमुख व कुडाळचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट व माजी नगरसेवक मंदार केणी यांनी नारळ लढवून स्पर्धेस सूरुवात केली. विजेत्या किरण मेस्त्री याला रोख रू ५००० व चषक तर द्वितीय मानकरी भार्गव वरक याला रोख रू ३००० व चषक देण्यात आला. बक्षीस वितरण कार्यक्रमास मसुरे विभाग प्रमुख पिंट्या गावकर, गोळवण विभागप्रमुख भाऊ चव्हाण, रेवंडी सरपंच अमोल वस्त, संदीप महाडेश्वर, युवासेना उपतालूकाप्रमुख अमित भोगले, युवासेना विभाग प्रमुख राहूल सावंत, युवासेना शाखा प्रमुख पप्पू परब, किशोर कासले, निलेश मालवणकर, आयवण फर्नांडिस, बाबू आंगणे, तनुराज आंगणे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3593

Leave a Reply

error: Content is protected !!