भाजपा मालवणात “निलेश राणे विजयी संकल्प अभियान” राबवणार !

गावागावात कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम तयार ; प्रमुख पदाधिकारी बैठकीनंतर तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात खालच्या पातळीवर टीका झाली तर…. धोंडू चिंदरकर यांचा सज्जडं इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे हेच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार असतील. मतदार संघातील गावागावात त्यांचा संपर्क निर्माण झाला असून २०२४ च्या निवडणुकीत त्यांना विजयी करण्याचा चंग गावागावातील कार्यकर्त्यांनी बांधला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने मालवणात “निलेश राणे विजयी संकल्प अभियान” राबवले जाणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येक गावात दोन कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टच्या भाषणात भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरण या विषयांवर भाष्य केले आहे. यावरून नेत्यांच्या मुलांना म्हणजेच नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे, आ. नितेश राणे यांना उमेदवारी मिळणार नसल्याच्या अफ़वा विरोधकांकडून पसरवल्या जात आहेत. मात्र राणेसाहेबांच्या दोन्ही सुपुत्रानी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले असून परिवारवादात त्यांच्या नावाचा समावेश होत नाही. त्यामुळे कुडाळ, मालवण मतदार संघातून निलेश राणे यांना उमेदवारी मिळून ते १०० % विजयी होणारच असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

भाजपाच्या मालवण तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कुंभारमाठ येथे रविवारी सकाळी घेण्यात आली. बैठकीनंतर श्री. चिंदरकर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर, आपा लुडबे, पूजा सरकारे, ललित चव्हाण, मकरंद राणे, संतोष गावकर, दीपक सुर्वे, राजू परुळेकर, राजेश तांबे, अशोक चव्हाण, दीपक पाटकर, महेंद्र चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. चिंदरकर म्हणाले, मालवण तालुक्यात भारतीय जनता पक्षाभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून शतप्रतिशत भाजपा हे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने आजची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत भूत अध्यक्ष शक्ती केंद्रप्रमुख जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांना बरोबर घेऊन स्वतंत्र टीम तयार करून भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळवून देण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे त्यासाठी भाजपच्या वतीने मालवणात निलेश राणे विजय संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे यामध्ये गावागावात कार्यकर्त्यांच्या नेमणुका अरुण त्यांच्या माध्यमातून प्रचाराची रणनीती ठरवत कोणत्याही परिस्थितीत निलेश राणे यांना आमदार बनवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे

१५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार, परिवारवाद आणि पुष्टीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. भ्रष्टाचारा मुळातून उपटून काढण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेतच. पण या भाषणातील परिवारवाद या उल्लेखाचे राजकारण करत नेत्यांच्या मुलांना यापुढे भाजपा निवडणुकीचे तिकीट देणार नाही, अशी ओरड विरोधकांकडून सुरू आहे. जे नेते आपल्या नंतर थेट आपल्या मुलांना अथवा पत्नीला राजकारणात आणून पदावर बसवतात अशांची व्याख्या परिवारवाद या विषयात होते. मात्र भाजप नेते निलेश राणेे हे गेली १५ ते २० वर्षे सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत. गोरगरिबांच्या प्रश्नांना आणि अडचणींच्या वेळी धावून जात त्यांना वेळोवेळी मदतीचा हात त्यांनी दिला आहे. तर नितेश राणे हे दोन वेळा कणकवली मतदारसंघात आमदार असून राणेंच्या दोन्ही सुपुत्रांमार्फत जमिनीवर उतरून जनसेवेचे कार्य आहे. त्यामुळे परिवारवाद या विषयात राणे.कुटुंबाचा उल्लेख करणे चुकीचे आहे. यासंदर्भात आम्ही भाजपाचे ज्येष्ठ नेते पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी देखील चर्चा केली असून त्यांनीही निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण मतदार संघात जोमाने काम सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. आज जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बरोबरच पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे हातात हात घालून काम करत असून निलेश राणे यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करण्याची व्यूहरचना भाजपच्या वतीने आखण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

आ. वैभव नाईक आणि मंडळी भयग्रस्त

भाजपा नेते निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन आज कुडाळ आणि मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहेत. गणेश चतुर्थीच्या पूर्वी या दोन तालुक्यात १२ काय २४ पक्षप्रवेश होतील. या पक्षप्रवेशांमुळे वैभव नाईक आणि मंडळी भयग्रस्त झाली आहेत. निलेश राणे हे ग्राऊंड लेव्हलला उतरून काम करणारे नेते आहेत. कोरोनाच्या काळात निलेश राणे यांना दोन वेळा कोरोनाची लागणही झाली होती. मात्र स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून त्यांनी जनसेवेचे कार्य सुरू ठेवले. त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊन अनेक ठिकाणचे कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत असल्याचे धोंडू चिंदरकर म्हणाले.

… तर त्यांना धडा शिकवण्याचा इशारा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे मुंबई – गोवा महामार्गाचे काम गणेश चतुर्थी पूर्वी पूर्ण होण्यासाठी जातीनिशी लक्ष देत आहेत. असे असताना मनसेकडून नाहक त्यांना टार्गेट केले जात आहे. भाजपाचे कार्यकर्ते हे भिडणारे आहेत तर मनसेचे कार्यकर्ते हे दगड मारून पळून जाणारे आहेत. ठाकरे बंधूपैकी एक ठाकरे नारायण राणेंच्या नादी लागले आणि स्वतःचे अस्तित्व हरवून बसले. आता दुसऱ्या ठाकरेंनी रवींद्र चव्हाण या कोकण सुपुत्राच्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नये. सोशल मीडियावर मनसेचे काही कार्यकर्ते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर व्यक्तीगत टीका करत आहेत. त्यांनी स्वतःला आवर घालावा, अन्यथा भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे हे विसरून अशा सोशल मीडिया बहादूर कार्यकर्त्यांना धडा शिकवण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा धोंडू चिंदरकर यांनी दिला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3593

Leave a Reply

error: Content is protected !!